श्री संत चोखामेळा समाधी मंदिर

Kirtan

विठ्ठल भक्ती

थोर संतांच्या वंशजांची भक्ति सेवा

Pandharpur Wari

श्री संत चोखामेळा उत्सव

उत्सवाचे काही क्षण

Kirtan

विठ्ठल भक्ती

कीर्तन सेवेची परंपरा

Kirtan

गजसेवा

गजाकडून उत्सव काळात पुष्पहार अर्पण

संत चोखामेळा

Chokhamela Samadhi mandir Trust

संत चोखामेळा हे १४ व्या शतकातील महाराष्ट्रातील एक महान संत होते. ते विठ्ठलाचे भक्त होते आणि वारकरी संप्रदायाचे एक महत्त्वाचे संत म्हणून ओळखले जातात. चोखामेळा हे मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणपुरा या गावंचे रहिवाशी. अस्पृश्य समाजात जन्मलेले त्यामुळे आयुष्यात सोसलेल्या त्रासाने त्यांनी त्यांच्या अभंगांमधून समाजातील विषमता आणि सामाजिक न्याय यावर भाष्य केले आहे.

आख्यायिकेनुसार त्यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी पंढरपूरी (पंढरपूर ) येथे आले . पंढरपूरी आल्यानंतर ते विठ्ठल भक्तीत दंग झाले. ते सदैव पांडुरंगाच्या नामस्मरणात व भजनात रंगून जायचे. त्यावेळी मंगळवेढे नगरी भरभराटीस आली होती. मंगळवेढ्यातील वेशीच्या तटाची भिंत बांधण्याचे काम सुरू होते. बांधकाम करण्यासाठी पंढरपूरचे मजूर बोलावण्यात आले. त्या मजुरासोबत चोखामेळा तटाच्या भिंतीचे बांधकाम करण्यासाठी सहकुटुंब मंगळवेढ्यास आले. किल्ल्याच्या पूर्वेकडील वेशीचे बांधकाम चालू असताना भिंत एकाएकी कोसळली व त्याखाली श्री चोखामेळाराया आणि अनेक मजूर मयत झाले ही घटना शके १२६० म्हणजे इ.स. १३३८ मध्ये वैशाख वद्य पंचमीस झाली.

चोखामेळा यांनी आपल्या अभंगांमध्ये भक्तीमार्ग, सामाजिक समता आणि मानवी मूल्ये यावर भर दिला आहे.

पुढे श्री संत नामदेव महाराज हे मंगळवेढ्यास आले परंतु एवढ्या लोकांमधून चोखोबाची हाडे कोणती हे कसे ओळखायचे. चोखामेळा विठ्ठलाचा निस्सीम भक्त त्यामुळे ज्या अस्थिमधून विठ्ठ्ल विठ्ठ्ल असा आवाज होता त्या अस्थि श्री चोखामेळारायांच्या आहेत असे ओळखून त्यांनी त्या पंढरपूरी विठठल मंदिरापुढे समाधी बांधली.

संत चोखामेळा यांचे समाधी स्थळ मंगळवेढा येथे मुख्य चौकात आहे . दर वर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भक्त संत चोखामेळा यांच्या समाधीला भेट देतात.

श्री संत चोखामेळा समाधी ट्रस्ट यांची पुस्तके

Chokhamela Abhang Gatha

चोखामेळा अभंग गाथा

प्रकाशक : श्री. संत चोखामेळा समाधी मंदिर

डाउनलोड
Sant Chokhamela smaranika

माणुसकीचा लळा भक्तीचा मळा चोखामेळा

प्रकाशक: श्री. इंद्रजीत घुले

डाउनलोड
Chokhamela

श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र

लवरकरच

श्री संत चोखामेळा समाधी मंदिर ट्रस्ट

श्री संत चोखामेळा समाधी मंदिर ट्रस्ट ही एक सामाजिक आणि धार्मिक संस्था आहे जी संत चोखामेळा यांच्या शिकवणुकीचा प्रसार आणि समाजसेवेचे कार्य करते. ट्रस्टची स्थापना २००६ मध्ये करण्यात आली आणि तेव्हापासून ही संस्था विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक उपक्रम राबवत आहे.

समाजसेवा

ट्रस्ट दरवर्षी गरजूंना अन्नदान, वस्त्रदान आणि वैद्यकीय सेवा पुरवते. गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे कार्य केले जाते.

शैक्षणिक कार्य

संत चोखामेळा यांच्या साहित्याचा प्रसार आणि संशोधन करणे, तसेच मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

आध्यात्मिक कार्य

संत चोखामेळा यांच्या समाधीस्थळाचे देखभाल, भक्तांची सेवा आणि वार्षिक उत्सवाचे आयोजन ही ट्रस्टची महत्त्वाची कार्ये आहेत.

नवीनतम बातम्या

मे २०२२

राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धा

एप्रिल २०१५

अभंग गाथा पुस्तक प्रकाशन

"संत चोखामेळा यांच्या अभंगाचे "अभंग गाथा " हे पुस्तक ट्रस्टतर्फे प्रकाशित करण्यात आले.

संपर्क

संपर्क माहिती

पत्ता:

श्री संत चोखामेळा समाधी मंदिर ,

चोखामेळा चौक , मंगळवेढा,

जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र - ४१३३०५

फोन:

+91 95272 69226